Ad will apear here
Next
पुण्यात कलानुभूती चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : नवोदित व हौशी कलाकारांनी काढलेली विविध प्रकारची कल्पनाचित्रे, निसर्गचित्र, व्यक्तिरेखा आणि त्यातील विविध भाव व नैसर्गिकरित्या तयार झालेल्या विविधांगी छटा पुणेकरांनी कलानुभूती चित्रकला प्रदर्शन व स्पर्धेत अनुभवल्या. 

नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच होतकरू आणि छंद म्हणून चित्रकला जोपासणाऱ्या कलाकारांना आपली कला सादर करायला संधी मिळावी यासाठी इव्हेंट हाउस एंटरटेनमेंटतर्फे ‘कलानुभूती’ चित्रकला प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे २७ व २८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत सुरू राहणार आहे. आजच्या सत्रात चित्रपट दिग्दर्शक नितीन विजय सुपेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनास हजेरी लावली. 

१००हून अधिक नवोदित कलाकारांनी काढलेले व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, अॅबस्ट्रॅक्ट, स्टील लाइफ अशा वेगवेगळ्या श्रेणींमधील तब्बल २०० चित्र या प्रदर्शनामध्ये असणार आहेत. याचबरोबर ‘अब नॉर्मल होम’ संस्थेतील विशेष मुलांनी काढलेली चित्रेदेखील या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत.

‘कलानुभूती’साठी पुणे आणि महाराष्ट्रातूनच नव्हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, बंगाल, दिल्ली आणि इतर राज्यांतून कलाकारांनी साधारण ६०० चित्र संस्थेकडे पाठविण्यात आली होती. त्यातील निवडक २०० चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZIUBZ
Similar Posts
कलानुभूती चित्र प्रदर्शन पुणे : नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच होतकरू आणि छंद म्हणून चित्रकला जोपासणाऱ्या कलाकारांना आपली कला सादर करायला संधी मिळावी, यासाठी ‘इव्हेंट हाऊस एंटरटेनमेंट’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कलानुभूती’ चित्रकला प्रदर्शन व स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धेत चेतना कुमारी
अनिल नेने यांचे वॉटरकलर आर्टवर्कचे प्रदर्शन औंध : आर्किटेक्ट आणि आर्टिस्ट अनिल नेने यांचे वॉटरकलर आर्टवर्कचे प्रदर्शन २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत औंध येथील रिलायन्स मार्टच्या बाजूला पीएन गाडगीळ अँड सन्सच्या आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. सकाळी ११.३० ते संध्याकाळी ८.३० या वेळेत हे प्रदर्शन सुरू असेल.
पुण्यात चित्रप्रदर्शन व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन पुणे : चित्र आणि संगीत या दोन कलांचा मिलाफ साधून राधा आणि कृष्णाचे नाते पुन्हा एकदा नव्याने अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे पुण्यातील आविष्कार क्रिएशन्सतर्फे आयोजित ‘मधुर सुरांतून चित्र बोलते...’ या अनोख्या चित्रप्रदर्शन आणि सांगीतिक कार्यक्रमाचे.
पुण्यात राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन पुणे : सुपरमाइंड फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नागपूर येथील नटराज निकेतन व सामवेद इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकबंदी व प्लास्टिकऐवजी पर्यायी नैसर्गिक घटकांच्या वापरातून ‘गो ग्रीन- से नो टू प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language